Mahindra XUV300 Facelift महिंद्रा अँड महिंद्राची पॉवरफुल लूक आणि फीचर्सची एसयूव्ही एक्सयूव्ही ३०० सुद्धा आहे. ज्याला कंपनीने आता नवीन व्हेरियंट मध्ये आणण्याची तयारी केली आहे. आगामी काळात अपडेटेड महिंद्रा एक्सयूव्ही ३०० फेसलिफ्ट लाँच केली जाईल. 2023 महिंद्रा एक्सयूवी300 फेसलिफ्ट मध्ये सध्याच्या मॉडलच्या तुलनेत मोठी फ्रंट ग्रिल आणि बंपर सोबत नवीन डिझाइनचे हेडलँम्प आणि टेललँम्प सारखे बाहेरिल फीचर्स पाहायला मिळतील. अपकमिंग एक्सयूव्ही ३०० फेसलिफ्टचे एक्सटिरियरला जबरदस्त बनवण्यासोबत त्यात खूप काही डिझाइन एलिमेंट्स टाकू शकतात. ज्यामुळे ही स्पोर्टी लूक मध्ये दिसेल. यात अनेक नवीन कलर ऑप्शन्स सुद्धा पाहायला मिळू शकतील.