मराठा आरक्षण आंदोलानासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी दि. ११ मे रोजी बीड मधील माजलगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठे जातीयवादी असल्याचा आरोपवार प्रतिउत्तर दिले आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मराठे जातीयवादी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्ही जातीयवादी असतो तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे मंत्री, खासदार झालेच नसते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुडे हे आमदार झाले नसते, प्रीतम मुंडे खासदार झाल्याच नसत्या.
तुम्ही जर मराठ्यांना विरोधक समजत असाल तर मराठे तुम्हाला कसे निवडून देतील? तुम्ही आहात तरी किती? आम्ही एकटे मराठेच साडेसहा लाख आहोत, त्यात मुस्लीम तीन लाख मिसळले तर खाली काय राहते?, असा सवाल जरांगेंनी केला आहे.
खासदार विखेंच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी माझ्या जिल्ह्यात जातिवादाचे विषारी राजकारण होत आहे, पण मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. एका मराठा बांधवासाठी (डॉ. सुजय विखे) मी येथे आली आहे. माझ्या जिल्ह्यातील लोकांनी ते पहावे. जातपात, धर्म न मानणाऱ्या पक्षात आम्ही आहोत, असे प्रतिपादन केले होते.