अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. राज्यात काका पुतण्यांमध्ये राजकिय लढाई अनेक वेळा पाहण्यात आली आहे. प्रकाश सोळंके यांनी मात्र पुतण्याला पुढे आणण्यासाठी स्वतः राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केलं असून आपल्या राजकीय वारसदाराचीही त्यांनी घोषणा केली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. सध्या प्रकाश सोळंके हे 2024 च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत जयसिंह सोळंके निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.
पुतण्यासाठी काकांनी केला आमदारकीचा त्याग…. अजित पवारांच्या आमदाराची निवडणूक न लढविण्याची घोषणा…
- Advertisement -