Saturday, September 14, 2024

अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध मोठी कारवाई

मिरजगाव ता कर्जत येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे आरोपी विरुद्ध कारवाई करून 5,30,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मीळाली की,एक इसम पांढरे रंगाचे टाटा कंपनीचे ट्रक यामधुन माहीजळगाव ते मिरजगाव जाणारे रोडवरुन वाळूची चोरुन वाहतुक करीत आहे. आत्ता गेल्यास ते मुद्देमालासह मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने
स्थानिक गुन्हे शाखा पोनि दिनेश आहेर यांनी तात्काळ त्यांच्या पथकातील पो.हे.की/ 1733 अतुल भानुदास लोटके, पी.कॉ/310 अमोल पीपट कोतकर, चा.पो.कॉ/841 अरुण चिमराव मोरे पोकॉ/ 800 भाऊसाहेब काळे यांना हकीकत सांगुन सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.पोनि दिनेश आहेर यांच्या आदेशानुसार पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी ठिक 23/45 वा. चे सुमा. सदर चालकास थांबण्याचा इशारा करून सदर ट्रक चालकाने त्याच ताब्यातील वाहाण रस्त्याचे कडेला थांबविले असता ट्रक चालकास ताब्यात घेऊन ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता सदर चालक याने त्याचे नाव देवानंद हनुमंत टकले, वय 19 वर्षे, रा. आंबेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर असे असल्याचे सांगीतले त्याचे ताब्यातील 12/08/2024 बाबत विचारले असता त्याने वाळु वाहतुकीचा परवाना नसलेबाबत सांगीतले. तसेच त्यास सदर ट्रक कोणाच्या मालकीचा आहे असे वा विचारले असता त्याने सदरचा ट्रक हा प्रवीण काळे, (पुर्ण नाव माहीत नाही) रा. माहीजळगाव, ता. कर्जत याचे मालकीचा असुन त्याचा क्रमांक एम. एच. 14 बी. एम. 3188 असा असलेबाबत सांगीतले आहे. सदर पकडलेल्या
ट्रक वाळुने भरलेली होती.
करता त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1) 500,000 /- रु की चा एक टाटा कंपनीचा पांढरे रंगाची कॅबीन व लाल रंगाचा हौदा असलेला नंबरची खाडाखोड केलेला त्याचा चेसी नंबर MAT373169C1K14199 असा असलेला जुना वापरता ट्रक किं, अंदाजे
2) 30,000/- रु. किं. ची. ट्रकच्या हौद्यामध्ये भरलेली 03 ब्रास वाळु कि, अंदांजे,
530,000/- रू /एकुण किंमत.
वरील वर्णनाचा व किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने
इसम नामे (1) देवानंद हनुमंत टकले, वय 19 वर्षे, रा. आंबेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर, 2) प्रवीण काळे, (पुर्ण नाव माहीत नाही) रा. माहीजळगाव, ता. कर्जत यांनी संगणमत करून बेकायदेशीरपणे, विनापरवाना वाळुची चोरी करून वाहतुक करताना मिळुन आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे यांनी त्यांचेविरुध्द भारतीय न्याय सहिता कलम 303(2),3(5) फिर्याद गुन्हा दाखल करून आरोपीस मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles