वायनाड (केरळ) जिल्ह्यातील चार गावात विनाशकारी भूस्खलनामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
पारनेर तालुक्यातील बोन्द्रे येथील मेजर सीता शेळके हिने या बचावकार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मेजर सीता शेळके यांनी भारतीय सैन्याच्या इंजिनिअर्स रेजिमेंटच्या टीमसोबत केरळ भूस्खलनाच्या ठिकाणी मदतकार्यासाठी पूल बांधण्यासाठी आघाडीचे नेतृत्व केले आहे. त्यांना मेजर अनिश यांनी सहकार्य केले. भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने अगदी कमी कालावधीत आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी १९० फूट लांबीचा एक तात्पुरता बेली ब्रिज निर्माण केला.
याबाबत मेजर सीता शेळके यांच्या या कामगिरीचे खासदार निलेश लंके यांनी कौतुक केले आहे.
वायनाड विनाशकारी भूस्खलन…मदत कार्यात पारनेरच्या मेजर सीता शेळकेंची महत्वपूर्ण भूमिका…
- Advertisement -