पदार्थांची चव वाढविणं हा अनेक लोकांसाठी डाव्या हाताचा खेळ असतो; पण बहुतेक सर्व लोकांना पोळ्या बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. गोलाकार आणि मऊ पोळ्या कशा बनवायच्या हे केवळ अनुभवी लोकांनाच माहीत असतं. पोळ्या करायला त्यांना वेळ लागत नाही आणि ते झटपट गोल व मऊ पोळ्या बनवू शकतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; जी पोळी बनविण्याच्या कलेत पारंगत आहे. जर तुम्हालाही अल्पावधीत भरपूर पोळ्या बनवायच्या असतील, तर व्हिडीओमध्ये महिलेने दाखविलेले तंत्र अवश्य फॉलो करा.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कमी वेळेत व जास्त संख्येने पोळ्या कशा बनविता येतात हे सांगण्यात आले आहे. महिलेचे पोळी बनविण्याचे हे तंत्र लोकांना फार आवडलेले दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पिठाचा एक मोठा गोळा घेते आणि नंतर त्याला मोठ्या आकारात लाटताना दिसत आहे. पीठ लाटल्यानंतर ही महिला वाटीच्या साह्याने चार गोल पोळ्या कापताना दिसते.