घरी दही बनवणाऱ्या लोकांची नेहमी तक्रार असते की घरी बनवलेले दही घट्ट होत नाही पण आज आम्ही एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तु्म्ही दही घट्ट बनवू शकता. फक्त एक वस्तू वापरुन तुम्ही दही घरच्या घरी घट्ट बनवू शकाल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही फक्त दोन तासांमध्ये तुम्ही दही घट्ट बनवाल.
युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुरुवातीला एका भांड्यात फुल क्रिम दुध घ्या.
त्यानंतर हे दुध गरम करून घ्या. त्यानंतर दुध कोमट होऊ द्या. पूर्णपण थंड होऊ देऊ नका.
या कोमट दुधात तुरटीचा खडा फिरवून घ्या. त्यानंतर तुरटी बाहेर काढा
त्यानंतर त्यात एक दोन चमचे दही घ्यायचं आणि दोन तिन मिनिटे मिक्स करा.
एका दुसऱ्या भांड्यात हे दुध घ्यायचं.
थोडा गरम केलेल्या कुकरमध्ये हे दुधाचं भांडं ठेवायचं आणि झाकण लावून हा कुकर उन्हामध्ये दोन तास ठेवायचा.
दोन तासानंतर हा कुकर उघडून पाहल्यानंतर तुम्हाला दुधाचं दही झालेलं दिसेल.