Wednesday, April 17, 2024

फिल्मी स्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन रिल्स बनवणं युवकांच्या अंगलट, नगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि / श्री. दिनेश आहेर हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांची माहिती घेत असतांना दिनांक १६/०२/२०२४ रोजी इन्स्टाग्रामवर फिल्मीस्टाईलने हातात गावठी कट्टा घेवुन फिरणा-या इसमाची रिल्स प्रसारीत झाली होती.

सदर इन्स्टाग्रामरिल्सची तांत्रिक विश्लेषणाचे आधारे खात्री करता सदर रिल्स खरी असल्याचे निदर्शनास आल्याने पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, विजय ठोंबरे व प्रशांत राठोड अशांचे पथक नेमुन इन्स्टाग्रामवरील रिल्स मधील इसमाचा शोध घेणे कामी आवश्यक सुचना देवुन पथक रवाना केले.नमुद सुचनांप्रमाणे दिनांक १६/०२/२४ रोजी स्थागुशा पथक इन्स्टाग्रामवरील इसमाची सोनई परिसरात शोध घेत असतांना स्थागुशा पथकास गुप्तबातमीदारा मार्फत रिल्स बनवणारा इसम घोडेगांव ते मिरी जाणारे रोडवर, मांडे मोरगव्हाण शिवारात, कानिफनाथ मंदीरा जवळ त्याचे साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करीता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगांव ते मिरी जाणारे रोडवर, मांडेगव्हाण शिवारातील, कानिफनाथ मंदीरा जवळ या ठिकाणी सापळा लावुन १) मिलिंद जालींदर मरकड वय १९, रा. मांडे मोरगव्हाण, ता. नेवासा व २) विधिसंघर्षी बालक रा. गजानन कॉलनी, अहमदनगर यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे अंगझडतीत ३०,०००/- रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा १
कट्टा (अग्नीशस्त्र) व ५०० /- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ३०,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द सोनई पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट ३ / २५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles