बऱ्याच लोकांना चहासोबत स्नॅक्स खायची सवय असते. काही जण चहासोबत एखादं बिस्कीट खातात, तर काहींना चहामध्ये रस्क टोस्ट बुडवून खायची सवय असते. यामुळे अवेळी लागलेली छोटी भूक भागते. तुम्हीही चहासोबत रस्क टोस्ट खात असाल तर सावध व्हायची गरज आहे. कारण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही टोस्ट खाण्याआधी एकदा तरी विचार कराल.
व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, टोस्ट बनवण्यासाठी एका टेबलावर पीठ ठेवून चार कामगार अगदीच विचित्र पद्धतीत त्याला मळून घेताना दिसत आहेत. तसेच एका अस्वच्छ भांड्यात तेल, पीठ घालून कोणतेही हातमोजे न वापरता त्याला हातानी हलवून घेतले जात आहे. तसेच एक कामगार सिगारेट ओढताना आणि एका हाताने मिश्रण एकजीव करताना दिसतो आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कामगार कारखान्यात तुमच्या आवडीचे रस्क टोस्ट कसे बनवतात हे तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
If this is true, I dread having a toast again! 🙄 #Food #hygiene pic.twitter.com/VXP9dkFp8A
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) November 20, 2023