सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ डान्स, गाण्याचे असतात. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर वेगवेगळ्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. असाच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी डान्स करता करता अचानक झोक्यावरुन खाली पडते.
सुट्ट्यांमध्ये अनेक लोक मालदीवला भेट देतात. मालदीवचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालदीवचे सौंदर्य, तेथील राहणीमान, निळाशार समुद्राचे व्हिडिओ सर्वांनीच पाहिले असतील. तेथे अनेक लोक डान्सच्या रिल शूट करतात. परंतु रील करता करता जर कोणी समुद्रात पडले तर.. एक तरुणी रिल बनवता बनवता अचानक समुद्रात पडते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.