Monday, June 17, 2024

मध्यरात्री गोळीबाराचा थरार, माजी महापौरांवर तीन गोळ्या चालवल्या परिसरात खळबळ

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार रंगला. मालेगाव शहराच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

एएमआयएमचेचे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर रविवारी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मलिक यांच्यावर हल्ल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घटना घडली. अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. एएमआयएच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे. मालेगाव शहरात मोठ्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींना सकाळपर्यंत अटक करण्याची मागणी एएमआयएमकडून करण्यात आली. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याची टीका मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles