नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्यमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. शरद पवार गट राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी अपक्ष उमेदवारीची केली घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळणार नसल्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवाराची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय.
आगामी विधान सभेत मालेगाव मध्यची जागा परंपरागत काँग्रेसची असल्याने संधी मिळणार नाही. त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी अपक्ष निडवणूक लढणार असल्याची घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसिफ शेख रशीद यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शक्यतांवर चर्चा करत अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. रशीद यांच्या या निर्णयाला पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलाय.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मालेगावमधील माजी आमदार आसिफ रशीद शेख हे अजितदादा पवार यांच्या सोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी जिल्हापद्धधिकारी म्हणून काम सुरू केले. लोकसभेला त्यांनी धुळे-मालेगाव मतदार संघातून उमेदवारीची तयारी केली होती मात्र महाविकास आघाडीकडून ही पारंपरिक काँग्रेसची जागा असल्याने काँग्रेसला सोडली. मात्र आगामी विधान सभेसाठी सुद्धा ही जागा काँग्रेसची असल्याने ती महाविकास आघाडी काँग्रेससाठी मागण्यास आग्रही राहील.हे लक्षात येताच अस्वस्थ झालेले आसिफ शेख यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी सर्वांनी मिळून अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. तसे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या निर्णयाचे पत्र पाठवले. रशीद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आगामी विधानसभा निवडणूक माजी आमदार आसिफ शेख हे अपक्ष लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.