Monday, September 16, 2024

पुनर्बांधणीसाठी माळीवाडा बसस्थानक काही काळासाठी बंद….तारकपूरला पर्यायी व्यवस्था…

माळीवाड्यातील अर्ध्या बस धावणार तारकपूरमधून

नगर : अहमदनगर विभागातील माळीवाडा बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम ४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माळीवाडा बसस्थानकातील काही फेऱ्या तारकपूर बसस्थानकातून सुटणार आहेत. ४ नोव्हेंबरपासून माळीवाडा बसस्थानक येथून मार्गस्थ होणारे पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धुळे, नाशिक, कल्याण, श्रीरामपूर, संगमनेर व नेवासा मार्गावरील सर्व बसेस तारकपूर बसस्थानकातून सुटतील व येथेच संपतील. माळीवाडा बसस्थानकातून फक्त तारकपूर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या आगारांच्या ग्रामीण फेऱ्या मार्गस्थ होतील. विद्यार्थ्यांसाठी पास वितरण व्यवस्था व प्रवाशांसाठी संगणकीय आरक्षण प्रणाली स्वास्तिक बसस्थानकात कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles