अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक असाच व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. थोडं खरचटलं तर आपण आई गं असं म्हणतो तेच एखाद्या मोठ्या संकटात आपल्या तोंडातून बापरे असेच उच्चार निघतात. परिस्थिती कोणतीही असूदेत वडिलांचं छप्पर असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. या व्हिडीओत वडिल आपल्या लेकाचा थंडीपासून कसा बचाव करत आहेत हे पाहायला मिळत आहे.
मुलाला थंडी लागू नये म्हणून वडील धडपड करत होते. शेवटी त्यांनी केलेला जुगाड पाहून खरंच तुम्ही सुद्धा भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्यावेळी बाईकवरून जाताना मुलाला खूप थंडी लागत होती. म्हणून वडिलांनी त्याला आपल्या शॉलखाली गुंडाळून घेतलं आहे. बरं, हे वडील एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मुलाला एका हातानं पकडलं आहे व दुसऱ्या हातानं ते बाईक चालवतायेत. एका हातानं हँडल पकडून स्टंटबाजी करणारे तरुण तुम्ही अनेक पाहिले असतील. पण हा स्टंट पाहून मात्र सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आलंय.
पिता का प्रेम…मां से कम नहीं होता।
बस वो जता नहीं पाते,उनका तरीक़ा दूसरा होता है। शायद ऐसा❣️
pic.twitter.com/q7shbDgodt— Abhinav Pandey (@Abhinav_Pan) January 4, 2024