दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर आता पुष्पा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा टिझर आणि काही गाणी रिलिज करण्यात आली आहे. तरुणाईमध्ये या गाण्यांची प्रचंड क्रेझ दिसत आहे. अशातच एका पठ्ठ्याने या गाण्यावर खतरनाक रील व्हिडिओ शूट केला आहे.
सोशल मीडियावर सध्या ‘पुष्पाराज’ हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. अनेकांनी या गाण्यावर रील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेत. अशात या गाण्यावर एका तरुणाने स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाचा स्टंट पाहून तुमच्या ही काळजात धडकी भरेल. भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीवर या तरुणाने स्टंट केला आहे.