बाईक, कार चालवताना भलती स्टंटबाजी करण्याची काही लोकांना फार हौस असते. अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठीही तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. माध्यमांवर अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुण धावत्या कारमधून पैशांच्या नोटा उधळताना दिसत आहे.राजधानी दिल्लीमधील नोएडामध्ये रस्त्यावर धावत्या कारमधून नोटा उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये नोएडाच्या रस्त्यावर रेंज रोव्हर या आलिशान कारमधून प्रवास करणारे काही तरुण कारच्या खिडकीतून नोटांची उधळण करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ सेक्टर-20 मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. सुसाट रेंज रोव्हर कारमध्ये बसलेला एक तरुण या नोटा उडवत आहे. तर स्कॉर्पिओमध्ये स्वार असलेले काही लोक हा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.
नोएडा की सड़क पर दिखा रहीसी का परचम लग्जरी गाड़ी में सवार नोटो को उड़ाता दिखा शक्स दूसरे कार से बनाई जा रही रील विडियो वीडियो सोशल मीडिया पर जमकर हो रहा है वायरल सेक्टर 20 क्षेत्र का बताया जा है वायरल @Uppolice @CP_Noida @dgpup @noidatraffic pic.twitter.com/ffwAGzszOM
— Raajesh Khatri (@KhatriRajeesh) February 22, 2024