वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला खास दिवस असतो. हा खास दिवस कुटुंबातील सदस्यांबरोबर आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीबरोबर घालवावा, अशी इच्छा मनात कुठेतरी घर करून असते. तर आज सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीनं स्वतःचा वाढदिवस मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य किंवा प्रेयसी-प्रियकरबरोबर न घालवता, सापांबरोबर साजरा केला आहे. पण, असं करण्यामागचं नेमकं कारण काय ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…
प्राणिसंग्रहालयाचे संस्थापक जय ब्रेवर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क त्यांनी ‘सापांची पार्टी’ ठेवली आहे. एका खोलीत अनेक विविध प्रकारचे, वेगवेगळ्या आकारांचे, अनोख्या रंगांचे व नक्षी असलेले साप दिसत आहेत. तसेच या सापांमध्ये प्राणिसंग्रहालयाचे संस्थापक झोपी गेले आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. व्यक्तीने आपला वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…