बंगला, फ्लॅट्समध्ये किचनच्या शेजारी एक छोटेसे डायनिंग टेबल असते. त्याच्या आजूबाजूला सर्व कुटुंब एकत्र बसून जेवणाचा आनंद घेते. हे डायनिंग टेबल्स सहसा लाकडाचे किंवा काचेच्या स्टायलिश डिझाइनचे असतं. पण, तुम्ही कधी चाकापासून तयार केलेले डायनिंग टेबल पाहिले आहे का ? पण, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका युजरने अनोखी शक्कल लावून घरच्या घरी डायनिंग टेबल तयार केले आहे.
एका तरुणाने सायकलच्या चाकापासून फाइव्ह स्टार हॉटेलप्रमाणे आकर्षक डायनिंग टेबल तयार केले आहे. तुम्ही पाहू शकता की, जमिनीवर एक लाकूड उभे करून, त्यावर सायकलचे चाक आडवे ठेवले आहे आणि या चाकावर जेवणासाठी तरुणाने अनेक पदार्थांची रचना करून घेतली आहे. चाक फिरविताच तरुणाला पाहिजे त्या पदार्थाची प्लेट समोर येईल आणि तो जेवणाचा आनंद घेऊ शकेल. तुम्हीसुद्धा पाहा सायकलच्या चाकापासून कसे तयार केलेय हे डायनिंग टेबल.