मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णयाला स्थगित देत आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे मसने कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022






