नगर दक्षिण मधून काँग्रेसने उमेदवारीचा आदेश दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार.
सौ.मंगल भुजबळ.
अहमदनगर -अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार 65% असल्याने ओबीसिंच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसपक्ष्याने जागा घेतल्यास काँग्रेस कडून आपणास उमेदवारीसाठी सज्ज रहा अश्या सूचना आल्याने मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे काँग्रेसच्या ओबीसी राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी म्हटले आहे.काँग्रेसच्या यादीत नगर दक्षिण लोकसभेसाठी ओबीसी उमेदवार म्हणून आपले नाव काँग्रेस हायकमांडपर्यंत गेले असल्याने व निवडणूक लढविण्यास तयार रहा अश्या सूचना आपल्याला काँग्रेस हायकमांड कडून आल्याने मी दक्षिण लोकसभा काँग्रेसकडून अन्यथा काँग्रेस पुरस्कुत लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राहुलजी गांधी साहेब यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात असल्याने आपण त्या यात्रेत व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या यात्रेचा समारोप 17 मार्चला शिवाजी पार्क मुंबई येथे होणार असून त्यानंतर त्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनतेच्या भेटीसाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नगर दक्षिण मधून काँग्रेसने उमेदवारीचा आदेश दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार…
- Advertisement -