अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन च्या बेमुदत आमरण उपोषणास काँग्रेसच्या मंगल भुजबळ यांनी दिला पाठिंबा..
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन यांनी दिनांक 26 ऑगस्टपासून त्यांना 7 वा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणेकामी सुरु करण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषणास काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ व प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी पाठिंबा देऊन कर्मचारी यांच्या व्यथा जाणून घेतल्या.. गेल्या 5 दिवसापासून कर्मचारी मुदगल, सारसर व राशीनकर हे बेमुदत उपोषणास बसले असून आज त्यांची तब्बेत खालावली असल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता सारसर यांचा बीपी वाढल्याचे निदर्शनास आले असता काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी सर्व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले तसेच मंगल भुजबळ व दीप चव्हाण यांनी युनियनचे पदाधिकारी यांना आयुक्त यशवंत डांगे साहेब यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांच्या सातव्या आयोगाबाबत चर्चा केली..
मनपा कर्मचाऱ्याच्या बेमुदत आमरण उपोषणास काँग्रेसच्या मंगल भुजबळ यांनी दिला पाठिंबा
- Advertisement -