Saturday, March 2, 2024

Video: नवरदेव स्वत:च्याचं लग्नात चक्क ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त

सध्या तरुण वर्गापासून ते वृद्धापर्यंत मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मोबाईलचा वापर कामापेक्षा इतर मनोरंजनासाठी होऊ लागला आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे अनेक समस्यांना व्यक्तींना सामोरे जावे लागते. तरुणांमध्ये मोबाईलचा जास्त वापर दिसून येतो. काही काळापासून ऑनलाइन गेमिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे
त्यातं सर्वात जास्त व्यसन तरुणांमध्ये आहे. प्रत्येक तरुण कोणती ना कोणती ऑनलाइन गेम खेळत असतो. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एक तरुण चक्क स्वत:च्याचं लग्नाच्या वरातीत मोबाईलवर गेम खेळताना दिसून येतोय.
लग्नाचा दिवस प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील खास दिवस असतो. एका एका क्षणाचा अनुभव नववधु-नवरदेव घेत असतो.मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील नवरदेव चक्क ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त आहे.सध्या सोशल मीडियावर या व्हायरल होत असलेल्याच व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles