Wednesday, April 17, 2024

प्रकाश आंबेडकर यांचा सर्वात मोठा दावा, वंचितच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांचा पाठिंबा?

‘महाविकास आघाडीने जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेतला नाही. आम्ही जरांगे पाटील यांच्याशी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. येत्या काळात याबाबत निर्णय घेण्यात येईल. घराणेशाही सोडून गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाणार आहे. जैन उमेदवाराला तिकीट दिले जाईल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल” असं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून वेगळी वाट धरली आहे. याचे सूतोवाच त्यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामध्ये केले होते. वंचित स्वतंत्र लढणार आहे. शिवाय त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या संघटनेची मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
वंचित आघाडीने भलेही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्यासोबत जाण्याबाबतच्या दाव्यावर मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. जरांगे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमची चर्चा झाली परंतु आम्ही वंचितला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही ३० मार्चपर्यंत राजकीय निर्णय जाहीर करणार आहोत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles