Saturday, October 12, 2024

….आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? ‘या’ ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन

राज्यात दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा, आरएसएसचा दसरा मेळावा, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. आता या दसरा मेळाव्यात आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारला आहे. सरकारने आठवडाभर उपोषण करुन देखील आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले आहेत. यानंतर आता मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती येत आहे.

या मेळाव्याच्या नियोजनासाठी आज बीडच्या नारायणगड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरणार आहे. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण देखील ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles