मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहे. दरम्यान, त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे म्हणाले की, “समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार आहे. आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहोत. आंतरवाली सराटीमधून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून, दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर, ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहे. सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे जे काही पारंपारिक खेळ आहे, असे खेळ आयोजित करण्यात येतील. आनंद उत्साहा करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत.जरांगे म्हणाले की, “मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांची नोंदणी करायला सुरुवात झाली आहे. मुंबईकडे निघतांना तीन तुकड्या करण्यात येणार आहे. ज्यातील एका तुकडीत पिण्याच्या पाण्याची, डॉक्टर, जेवणाची सोय असणार आहे. सोबतच ढोल, हलक्या असे पारंपरिक गोष्टी देखील घेऊन आम्ही जाणार आहोत. आमच्यासोबत अंदाजे 10 लाख वाहनं असण्याची शक्यता आहे. सोबत ज्वारी, बाजरीचे पीठ असणार आहे. तसेच, साबण, तेल आणि कोलगेट आशा गरजेच्या सर्व वस्तू सोबत घेऊन निघणार आहोत. पाऊस असल्यास ताडपत्री सोबत असणार, असल्याचे जरांगे म्हणाले.