Friday, July 11, 2025

देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचं आव्हान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला गुंतवायचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण होऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये नॉन बेलेबल वॉरंट पाटील यांच्या विरोधात जारी केलं होतं. याबाबत आज पुणे न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी ते बोलत होते.

आज झालेल्या सुनावणीबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आज उपोषणामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज मी न्यायालयात रुग्णवाहिकेत आलो आहे. मला कायद्याचा संविधानाचा तसेच न्यायाधीशांचा सन्मान आहे, म्हणून मी आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिलो आहे. मी न्यायालयाचा आदर करतो आणि करत राहणार आहे. न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे, त्या बाबत मी आत्ता काहीच बोलणार नाही.

एकीकडे आपण रुग्णवाहिकेतून उपचार घेत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र दौरा आणि पुढील विधानसभा बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझ्या तब्यतीला किंमत नसून समाजातील तरुणांना किंमत आहे. मी समाजासाठी रुग्णवाहिकेतून जाणार की कशातून जाणार? याला महत्त्व नाही. माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही. मग माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असो की सरकारचा कितीही विरोध असो, मी फडणवीस यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे यावेळी पाटील म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles