Tuesday, June 25, 2024

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा, सगळ्यांची टांगे पलटी करेन….तोपर्यंत शांत बसणार नाही

मला राज्यातून काढलं तर मी लई शहाणा आहे. इकडले मराठे तिकडल्या राज्यात बोलवून मोर्चे काढेन. जेलातले सगळे मराठे कैदी एकत्र करून मोर्चा काढीन. पण समाजाशी गद्दारी करणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेलमध्ये टाकाल. पण 6 कोटी मराठ्यांचं काय करणार राजकारणात हलक्यात घेऊ नका. सगळ्यांची टांगे पलटी करेन. आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिला.

मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही, असं षडयंत्र होतं. काही लोकांचं म्हणणं होतं की, मी जातीवाद करतोय. मराठा-ओबीसी वाद होतोय. माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की, मी ओबीसींना दुखावलं. मी गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलं नाही. जातीवाद केला कुणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे? मी 13 तारखेच्या मतदानापर्यंत चांगला होतो. 13 तारीख झाली. मतदान संपलं. मग गुरगुर सुरू झाली, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. 1 महिना शांत राहा, काही जण म्हटले निवडणूक झाल्यावर बघू. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत. कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा. एक महिना बघू. शेवटी नर्ड्याला लागल्यावर आहेच आम्ही, तुमच्यावर जर वेळ आली तर स्व:तचं संरक्षण करा. त्या जातीचा त्यांचा नेता कधीच निवडूण येऊ द्यायचं नाही. वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण पाडल्याशिवाय राहायचं नाही. ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून येऊ द्यायचं नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles