मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांना अचानक अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दौरा अर्धवट सोडून जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले. डॉक्टरकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू आहे. सततचे दौरे आणि उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये तब्बल ९०० एकरात जाहीर सभा घेणार होते. ८ जून रोजी त्यांची ही सभा होणार होती. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषणाचीही घोषणा केली आहे.