एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यावर चर्चा झाली. गुन्हे मागे घेण्यावर चर्चा झाली आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा होईल, असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलेय.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा मुंबई मंडळ आणि हैदराबाद संस्थानचे गॅजेटवर गतीने कार्यवाही व्हावी असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील आणि आम्ही काम वेगाने सुरू केले आहे. पण दोन वेगळे विषय आहे. मराठा समजाला आरक्षण मिळावे अशी पहिली मागणी होती. त्याप्रमाणे ती मागणी पूर्ण केली आहे. मराठा समजाला १० टक्के आरक्षण दिले आणि ते टिकले.
ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावलाय ते सांगा, कुठेही धक्का लावला नाही, असे शंभूराज देसाई केले. दुसऱ्या कोणाचाही आरक्षणाला धक्का ना लावता आरक्षण दिले आहे. आता जी मागणी आहे सगेसोयरे आणि हैद्राबाद गॅजेट लागू करावे, अशी मागणी आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी सलग सहाव्यांदा उपोषण सुरू केलंय. यावेळी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांनी टार्गेट केलंय.