Wednesday, April 17, 2024

मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, विनोद तावडे, पंकजा मुंडे, खडसे, अजित पवारांचा नामोल्लेख…

मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेबरोबरच भाजपातील काही नेत्यांचीही नावं घेतली.

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांची नावं घेतली. “एकनाथ खडसे कधीच भाजपा सोडू शकत नव्हते. त्यांच्यावर सोडायची वेळ आली. विनोद तावडे कधीच महाराष्ट्रातून बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांना दिल्लीला जावं लागलं. नाना पटोले कधीच भाजपा सोडू शकत नव्हते, त्यांना जावं लागलं. पंकजा मुंडे, त्यांचे वडील आणि मामा आयुष्यात भाजपा सोडू शकत नाहीत. आज त्यांची अवस्था काय आहे. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही, त्यांनाही फडणवीसांमुळे पक्ष सोडावे लागलेत. ज्यांची नावं आली आहेत, त्यांनी शांतपणे फक्त मान हलवून तरी मान्य करावं”, असं जरांगे पाटील म्हणाले.

महादेव जानकरांना ते कधीच धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देणार नाहीत. जीव गेला तरी प्रफुल्ल पटेल आयुष्यात राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते. पण तुरुंगाचा एवढा धाक दाखवला की त्यांना ते करावं लागलं. अजित पवार कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकत नव्हते. पण नाईलाज इतका केला, की तुरुंगात जाण्यापेक्षा यांच्यासोबत गेलेलं बरं म्हणत तेही गेले”, असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles