मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपायला अवघे काही दिवस उरलेत. २४ डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील रणनिती ठरवण्यासाठी १७ डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे.
“१७ तारखेला महाराष्ट्रातील मराठी समाजाची बैठक बोलावली आहे, स्वयंसेवक, साखळी उपोषण कर्ते, वकील डॉक्टर, तज्ञ, अभ्यासक या सर्वांनी अंतर वाली येथे बैठकीस यावे , यासह राज्यातील मराठा समाज उपस्थित राहावे..” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
“जिथे सभा झाली तिथेच ही बैठक होणार आहे. त्या दिवशी १२ ते ३ मध्ये होणाऱ्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी निर्णायक बैठक होईल. समाजाने प्रत्यक्षात उपस्थित राहावे , जारांगे यांचे समाजाला आवाहन. बैठकीच्या अमंत्रणाची वाट पाहू नका, सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी मध्ये यावे…” असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.”सगळे आतापर्यंत मराठ्यांशी गोड बोलले. अनेक प्रश्न अद्यापही सोडवले गेले नाहीत. कोपर्डीचा खटला अजूनही निकाली निघाला नाही. पूर्वीच्या बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांना नोकरी देऊ म्हंटले होते अजून नोकरी दिलेली नाही. मराठे आता एकतर्फी झालेत. फक्त राजकारणी राहिलेत. त्यांना विनंती करून एकत्र आणण्याचा प्रयत्न करू…” असे जरांगे पाटील म्हणाले.