Wednesday, April 17, 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पहाटे ३ वाजता फोन केला होता…

मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला होता. गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं. त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले. एक वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही. त्यानंतर पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नाही. पण कारवाया सुरुच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे असंच दिसतं आहे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही. दुसरीकडून कारवाया सुरुच आहेत. ” असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे.आंदोलन, कार्यक्रम चार महिन्यांपूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल केले जात आहेत. जेसीबी लावले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं सुरु केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली आहे. मी फुटणार नाही, हटणार नाही. कायद्याचं पालन करणार आहे. आदर्श आचारसंहिता आहे तोपर्यंत यांना पुन्हा सुख मिळतंय हरकत नाही. पण मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ” असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles