Sunday, July 21, 2024

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितलंय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती करू द्या.त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC ST ला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.त्याचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles