Saturday, March 2, 2024

तर ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करू, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंबंधीचं राजपत्र काढण्यात आलं. ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना (अध्यादेश नव्हे) राज्य सरकारने जारी केली आहे. त्यानंतर राज्यात जरांगे विरुद्ध ओबीसी नेते हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू, असं वक्तव्य केलं आहे.

जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तिखट प्रतिक्रिया देत जरांगे यांना खुलं आव्हान दिलं आहे. “मनोज जरांगे म्हणतात तुम्ही जर आमच्या आरक्षणाला विरोध कराल तर आम्हीही ओबीसी आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालवू. याचाच अर्थ असा होतो की मनोज जरांगे यांना गोरगरीब मराठा पोरांचं काहीही पडलेलं नाही. तुम्हाला हजारो वर्षांपासून ज्यांचे मानवी हक्क अधिकार डावलले गेले त्या माणसाला संविधानाने समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेले आहे. आरक्षणाच्या माध्यमातून या लोकांना जी प्रतिनिधित्वाची भाषा केली आहे नेमकी तीच जरांगे यांना संपवायची आहे”.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles