Monday, July 22, 2024

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, मनोज जरांगेंची मोठी प्रतिक्रिया म्हणाले…

पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी घेणार त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचा कारणच नाही. आम्ही यापूर्वीही कधी विरोध केला नाही. मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानले. त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पद मिळालं मराठ्यांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या. मराठ्यांनी त्यांना कधी विरोध केला नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

पंकजा मुंडे यांना आमदार करणं न करणं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे… मराठ्यांचा काही देणं घेणं नाही. आम्ही त्याचं स्वागत केलं आणि नाही केलं तरी त्यांच्यात काही फरक पडणार नाही. त्यांच्या समाजाचा मत परिवर्तन होत असेल तर नक्की कौतुक आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.माझ्या समाजाचं नुकसान होतंय का? नुकसान होतोय हे माझ्या समाजाला चांगलं माहित आहे. कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्या ताईंविरोधात तर आम्ही कधी एक शब्दही बोललो नाही. माझ्या समाजाचा चांगलं होते की नुकसान होते हे माझ्या समाजाला चांगलं माहित आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles