मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला महाराष्ट्रभर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील नगर शहरात येणार असून, नगरमध्ये भव्य शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे. केडगाव येथे या रॅलीचे स्वागत होणार असून, माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली सुरू होईल. रॅली नगर शहरात सुमारे साडेसहा किलोमीटर अंतर पार करून चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे.
सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत. नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.गरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील.
नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल.केडगाव येथे स्वागत-कायनेटिक चौक-सक्कर चौक, माळीवाडा बसस्थानक मार्केट यार्ड चौक, माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, तेलिसुंट, चितळे रोड मार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे. केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटाका मार्केट भरणारी जागा, शहरात क्लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज,सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.