संभाजी भिडे यांच्या भूमिकेवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.“लय बेस्ट. वाघ मागत नसतो. शिकार करून घेत असतो. त्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांची चूक असण्याचे कारण ही नाही. जे भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील आणि हे देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
‘फडणीसांनी ज्यांना बोलायला लावलं त्यांच्यापासून समाज दूर गेला’
“देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना-ज्यांना बोलायला लावले तर त्यांच्यापासून मराठा समाज दूर गेला आणि भिडे गुरुजींसोबत ही मराठ्यांची पोरं आहेत आणि ते आता लांब जातील. देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वतःला संपवायला लागला आणि त्यांचे नेतेही संपवत आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि हा फडणवीस यांचा सहावा ते सातवा डाव आहे”, असा आरोपदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.