Friday, January 17, 2025

उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. प्रकृती खालावली असताना देखील जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. यावेळी देखील जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे हे सगे सोयरेच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. हैद्राबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट सरकारने तात्काळ लागू करावं अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत काहीशी खालावली होती. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून त्यांना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरनी सांगितले. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकारकडून आंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांनी जरांगे पाटिल यांची भेट उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत आहेत. अशामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने जरांगे यांची तपासणी केलीय. मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत सोलापूरमधील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूरमध्ये होणारा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles