मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली आहे. दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर तोफ डागली.
मनोज जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी आंदोलन शांततेमध्येच व्हायला हवं यावर जोर दिला आहे. ते इकडे येणार आम्हाला शांत करणार, तिकडे जाणार त्यांना उचकवणार. तुम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे का? असा प्रश्नही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ठरल्याप्रमाणे आम्हीही 40 दिवस काही बोलणार नाही, पण सरकारनेही जबाबदारी पार पाडली पाहिजे, राज्य चालवायचं आहे. आपण संविधानिक पदावर बसलो आहे. समाज शांत करायचा ते सोडून तुम्ही एकाला उचकवणार, असं करू नका, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मराठ्यांनी छगन भुजबळांना बळ द्यायचं काम करू नये, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना बळ देऊ नका, अशी थेट भूमिका जरांगे पाटील यांनी हिंगोलीमध्ये घेतली आहे.