मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापूर्वी माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसंच सरकारला त्यांनी मुदत दिली आहे.
४ जूनला आम्ही उपोषण करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे उपोषण करणार आहोत. ४ जूनला आंतरवली सराटीतून आम्ही उपोषण सुरु करणार आहोत. आम्हाला कोण पडलं, कोण निवडून आलं याचा आम्हाला आनंद नाही. आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे. आम्हाला बाकी कशात आनंद नाही. ४ जूनची तारीख आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आमचं शांततेचं युद्ध आहे त्याच मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची , ज्या केसेस मागे घ्यायच्या ठरल्या आहेत त्या मागे घ्यायच्या, शिंदे समितीचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायचा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. नवीन मागणी कुठलीही नाही. आता सगळा मराठा एकवटला आहे. ६ जून पर्यंत सरकारने आरक्षण द्यावं ते झालं नाही तर आंदोलन बंद करणार नाही. कठोर आमरण उपोषण होणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अन्यथा… मनोज जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा
- Advertisement -