Wednesday, April 17, 2024

मनोज जरांगे पाटलांचा कडाडून हल्लाबोल, हा भोंदू महाराज ….हा सरकारचा ट्रॅप!

अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.जरांगेंनी या आरोपांचं खंडन केलं असून सरकारकडून ट्रॅप लावण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. सरकारने आता कितीही ट्रॅपलावले माणसं फोडली तरी मराठा आंदोलक आता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ धडकणार आहेत.

अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला.

मनोज जरांगे म्हणाले, तो (अजय बारसकर) कुठल्या नेत्याबरोबर फिरत होता, कोणत्या नेत्याच्या मागे मागे पळत होता, याचे सगळे रेकॉर्डिंग्स आमच्याकडे आहेत. आता मराठ्यांना आरक्षण मिळत आहे, तर ही गोष्ट काही लोकांच्या डोळ्यात खुपतेय. जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल तोंडून जे शब्द निघाले त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतं. मी त्यानंतर आत्मक्लेश केला. माफी मागितली, मी त्याबद्दल आताही तोंडात मारून घेतो. चुकून काहीतरी निघून गेलं असेल. परंतु, त्यानंतरही बारसकर हे सगळं बोलणारच आहे. त्याला तेच काम देण्यात आलं आहे. त्याला आपल्यावर टीका करण्याचा ठेका दिला आहे.

जरांगे-पाटील म्हणाले, अजय बारसकरसारखे प्रवचनकार असतील तर जनता कशी सुधारेल? त्याला माझ्या हातून पाणी प्यायचं होतं, त्याला भोंदू बाबा व्हायचं होतं. दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी प्रवक्त्याला मंत्री व्हायचं आहे. बारसकर आणि तो प्रवक्ता मिळून बदनामीचा डाव रचत आहेत. मी सर्व प्रसारमाध्यमांना विनंती करतो की तुम्ही आजपासून मला त्या बारसकरबद्दल काही प्रश्न विचारू नका. त्याला विनाकारण प्रसिद्धी दिली जात आहे. ज्याला समाजमाध्यमांवरही कोणी विचारत नाही, त्याला तुम्हा वृत्तवाहिन्यांच्या मुख्य कार्यालयांनी काही मिनिटात इतकं महत्त्व कसं काय दिलं? त्याची पत्रकार परिषद सर्व वृत्तवाहिन्यांनी लगेच लाईव्ह दाखवली (थेट प्रसारण केलं). याचा अर्थ त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे. यात सरकारचा मोठा ट्रॅप आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles