Sunday, December 8, 2024

मनोज जरांगेंचा मोठा इशारा, भुजबळ फक्त लोकसभेला उभे राहु द्या, मग सांगतो….

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असून छगन भुजबळ हे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. पण यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अशातच नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिलाय. मनोज जरांगे आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका, त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, असा इशारा जरांगेनी भुजबळांना दिला.

मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब अजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगेना प्रश्न विचारला असता, “मराठा समाजाला राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो”, असा इशारा जरांगेनी थेट भुजबळांना दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles