Wednesday, April 17, 2024

मनोज जरांगे पाटील लोकसभा लढविणार, म्हणाले ….माझ्यासमोर

फडणवीस यांचा डाव यशस्वी होत नाही तोवर लढणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा एसआयटी चौकशीची मागणी झाली. त्यावेळी फडणवीस यांनी म्हटले पोलिसांचा रिपोर्ट आला आहे. त्यात एसआयटी स्थापन करायची गरज नाही, असे म्हटले होते. मग आताच का एसआयटी चौकशीचा निर्णय झाला. कारण मी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण नाकारले आहे. यामुळे एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे.राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही. त्यासाठी आम्ही बोलत नाही. परंतु ओबीसीमध्ये जे फायदे आहेत, ते आम्हाला मिळाले पाहिजे.

एका अधिवेशनात बोलता अधिवेशनात एसआयटी चौकशी नको. दुसऱ्या अधिवेशनात चौकशी लावण्याचे आदेश देता. न्यायालय सांगते शांततेत आंदोलन करा. मग आम्ही शांततेत आंदोलन केले. मात्र गुन्हे दाखल केले जात आहे. खुन्नस दाखवली जात आहे. तुम्ही फुगे फोड्याची बंदूक दाखवता. मात्र मराठे घाबरत नाही.
आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांची भावना समाजाच्या प्रती बरोबर आहेत. परंतु सध्या ज्वलंत मुद्दा असताना राजकीय निर्णय नको. माझा तो मार्ग नाही. माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा आरक्षण आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles