जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच साखळी उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळूनच घ्यायचे, यावर एक मताने ठराव पारित करण्यात आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ही या बैठकीदरम्यान घेण्यात आली.