मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्याची देखील घटना समोर येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर , जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत.
मराठा समाज देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाऊलं उचलले जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून, वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.
संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद; एसटी सेवाही बंद राहणार
- Advertisement -