Monday, March 4, 2024

काँग्रेसच्या माजी खासदाराच्या कारला भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र आणि बाडमेरचे माजी काँग्रेस खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, माजी खासदार आणि त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवेंद्र सिंह आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून जयपूरला जात होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीवर आदळली. अलवरमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून माजी खासदार व मुलगा जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या छातीची बरगडी तुटली आहे. तर त्यांचा मुलगा हमीर याच्या हाताला व नाकाला फ्रॅक्चर झाले. तर कार चालकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. जखमींना उपचारासाठी अलवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles