Saturday, April 27, 2024

मराठा समाजाच्या बैठकीत राडा, उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा बांधवांची (Maratha Community) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही जण दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजाच्या बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.

काही कार्यकर्त्यांनी काही लोक येथे उमेदवारांकडून पैसे घेऊन आले आहेत, असा आरोप करत समाज बांधवांची एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर या बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे ही बैठक स्थगिक करण्यात आली. या हाणामारीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली.ल्याचा आरोप करत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles