Wednesday, April 30, 2025

भुजबळांना फडणवीसांचं बळ…हे भाजपसाठी चांगलं नाही,मनोज जरांगे पाटील स्पष्टचं बोलले

मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलेय. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांचं छगन भुजबळांना बळ असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे भाषणादरम्यान जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा दिला.

छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, यांचं एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. यांचं ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. भुजबळांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं, तरी केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. फडणवीस साहेब भुजबळांना बळ द्यायला लागले असं दिसत आहे. भुजबळ बोलले, त्यामुळेच गावा गावात जातीय तणाव निर्माण होत आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.
आम्ही शांततेच आव्हान करतो आणि तुम्ही लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे मराठ्यांच्या किती हिताचे आहेत, हे मराठयांना माहीत आहे. सगळं खाल्लं. फडणवीस साहेब याला बळ देत असल्याने भाजपसाठी हा चांगला संदेश नाही. आरक्षण ही केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. यांचं ऐकू नये. हा माणूस प्युअर जातीयवादी आहे. हा लहान जातींना सुद्धा आरक्षण खाऊ देत नाही, असे जरांगे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles