मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत लवकरच त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे.
मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयला विरोध केला आहे
नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटलं की, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो.सोमवारी 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन.
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी…
— Narayan Rane (@MeNarayanRane) January 28, 2024