Wednesday, February 28, 2024

मनोज जरांगे म्हणाले मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला रेल्वे भरून घेऊन जाणार

मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी आंतरवाली सराटीतून निघाले आहेत. २६ जानेवारीला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आजच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिनी ते अहमदनगरला आहे. त्यामुळे आजच्या महासोहळ्यात मनोज जरांगे पाटीलही अहमदनगर येथून सामिल झाले. याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.“आज भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं, आरती केली आणि विधिवत पूजाही केली. आज आमच्या भारतवासियांचा आनंदाचा दिवस आहे. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. हा आनंदाचा दिवस आम्ही अहमदनगर येथे साजरा केला”, असं मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी भगवान श्रीरामाकडे साकडे घातले का असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर जरांगे म्हणाले, “भगवान श्रीराम आज अयोध्येत विराजमान झाले आहेत. आज आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे उद्या त्यांच्याकडे साकडं घालू. उद्या वेगळं साकडं घालतो. आज फक्त आनंदच व्यक्त केला.”
तसंच, मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार का असा प्रश्नही पत्रकारांनी विचारला. त्यावर जरांगे म्हणाले, “मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येत जाणार. रेल्वे भरून घेऊन जाणार.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles